शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीची बैठक २९ जानेवारी रोजी

सावंतवाडी दि.२८ जानेवारी 
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या दि. ४ फेब्रुवारी रोजीच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक उद्या सोमवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला जिल्हा संपर्क – उपनेते अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख श्री. शैलेश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक बाळा गावडे ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार हे उपस्थित राहणार आहेत.
तरी शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी च्या सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख, सरपंच, इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.