वरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर उर्फ आप्पा सावंत यांचे हृदयविकाराने निधन

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तळमळीचा कार्यकर्ता हरपला

कणकवली दि.२८ जानेवारी
कणकवली वरवडे फणसनगर येथील रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते ,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत (८०) यांचे शनिवारी रात्री १२.१५ हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून पत्नीकडून पाणी मागून घेतले.”मी आता जातो..” असे सांगत त्यांनी प्राण सोडले.

आप्पा सावंत हे गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती ते शेवटपर्यंत अंगीकारली होती.समाजातील चुकांवर ते सातत्याने बोलत असायचे, तक्रारी देतच कणकवली तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आप्पा सावंत यांच्या बद्दल भीती आणि दरारा होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते निकटचे संबंध होते. आप्पा या नावाने ते परिचित होते. कणकवली तालुक्यात आप्पा सावंत हे सर्वांना परिचित असलेले व्यक्तिमत्व होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर वरवडे फणसनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.