इंद्रधनू देवगड आयोजित जिल्हास्तरिय बुध्दीबळ स्पर्धा खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम कॅरम स्पर्धेत योगेश कोळी प्रथम

देवगड,दि.२८ जानेवारी
इंद्रधनू देवगड संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये खुल्या गटात सावंतवाडी येथील बाळकृष्ण पेडणेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर तालुकास्तरिय कॅरम स्पर्धेत एकेरी गटात योगेश कोळी तर दुहेरी गटात प्रथम क्रमांक संदीप राणे व चंदन दळवी याने पटकावला. विजेत्यांना देवगड येथील युवा उद्योजक गौरव पारकर यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. इंद्रधनू देवगड या संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जामसंडे सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे जिल्हास्तरिय बुध्दीबळ व तालुकास्तरिय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन युवा उद्योजक गौरव पारकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, सचिव प्रशांत वाडेकर, सहसचिव उदय रूमडे, खजिनदार तुषार पाळेकर, सदस्य भावेश पटेल, प -शांत पटेल, दिनेश पटेल, मिलिंद मोर्ये, आनंद रामाणे, यतीन कुळकर्णी, चतुरंग बुध्दीबळ असोसिएशन देवगडचे खजिनदार श्रीकृष्ण रानडे, अभिषेक सांगळे, परिक्षक सुयश पेठे, मिहिर सकपाळ, कॅरम असोसिएशन देवगडचे प्रकाश प्रभू योगेश कोळी आणि मेषक राणे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरिय बुध्दीबळ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे, १० वर्षाखालील गटात अनुक्रमे सन्मिल साटेलकर, सौम्या तांबे, १४ वर्षाखालील गटात अनुक्रमे विभव राऊळ, पार्थ गावकर, अखिलेश ठाकुर, १७ वर्षाखालील गटात अनुक्रमे मिनल सुलेभानी, वरुण देवधर, सचिन शिंदे, महिला गटामध्ये अनुक्रमे गायत्री राठोड, समृध्दी चव्हाण, मधुरा पाटील, खुल्या गटात अनुक्रमे बाळकृष्ण पेडणेकर, अभिषेक सांगळे, अतिक हर्याण, सुश्रुत नानल, शुभंकर सावंत यांनी पारितोषिके पटकावली. तालुकासतरिय कॅरम स्पर्धेमध्ये एकेरी गटामध्ये अनुक्रमे योगेश कोळी, संदीप राणे, सनीत आचरेकर, हेमंत गाडगीळ त्याचबरोबर दुहेरी गटामध्ये अनुक्रमे संदीप राणे-चंदन दळवी, प्रकाश प्रभू हेमंत गाडगीळ, सनीत आचरेकर हरेंद्र तारी, योगेश कोळी मेषक राणे यांनी पारितोषिके मिळविली.