कणकवलीत मिशन ऑल आउट अंतर्गत २० वाहनांवर पोलिसांची कारवाई

१७ हजार ४०० रुपयांचा दंडात्मक कारवाई

कणकवली दि.२८ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली येथे पोलिसांनी मिशन ऑल आउट अंतर्गत वीस वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री ७ ते १० वाजण्याच्या मुदतीत केली.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाहनधारकांनी विना चालक परवाना, दुचाकीवर तीन सीट ,अवजड वाहनांवर क्लीनर नसणे,वाहनांना
नंबर प्लेट नाही अश्या २० वाहनांवर कारवाई करून
१७ हजार ४०० रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तसेच कणकवली शहरातील हॉटेल, लॉज यांची देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तपासणी करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री.देठे, वाहतूक पोलीस हवालदार आर.के. पाटील, रणजीत दबडे, सुशांत कोलते, रघुनाथ जांभळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभाग घेतला होता.