जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे शानदार उदघाटन !

देवगड,दि.२८ जानेवारी

वायंगणकर्स फिटनेस जामसंडे, कोकण सिंधू पावर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष व महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा उदघाटन सुवर्णकार महेश घारे माजी जि प सदस्या सौ मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक श्री गोलराखे ,नगरसेवक सुधीर तांबे,जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले,गणेश आचरेकर संजय सावंत ,गणेश वायगणकर सचिन,जाधव सुरेश कदम,शशांक साटम ,योगेश राणे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज ,श्री हनुमान,स्वर्गीय मधुकर दरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलनाने तसेच रामचंद्र वायंगणकर यांच्या हस्ते फित कापून श्रीफळ फोडून करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ मोमंटो देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी प्रास्तविक सूत्रसंचालन श्री प्रदीप नारकर यांनी केले .मुख्या. श्री गोलराखे ,दयानंद मांगले,संजय सावंत सौ मनस्वी घारे यांनी मार्गदर्शन करून स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
२८ जाने रोजी श्री मो .ज .गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी पार पडलेल्या
या स्पर्धेत सब ज्युनिअर ,जूनियर सीनियर व मास्टर या वयोगटातील पुरुष व महिला वजनी गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित स्पर्धकानी सहभाग घेतला आहे.