मालवण न्यायालयात ३ मार्चला लोकअदालत

मालवण,दि.२८ जानेवारी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय (क स्तर) येथे दि. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती, तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

ज्या पक्षकारांची दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंयायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे मिटवायची असतील, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहवे व लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. आर. देवकाते यांनी केले आहे.