नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ तालुकास्तरीय कॕरम स्पर्धेचा उद्घाटन उत्साहात संपन्न

दोडामार्ग,दि.२८ जानेवारी

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित तसेच माजी आमदार श्री.राजन तेली व भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश श्री. प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ तालुकास्तरीय कॕरम स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पिंपळेश्वर हाॕलमध्ये संपन्न झाला.

यावेळी स्पर्धेचे उद्घाटन दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री.चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.माजी पं.स.उपसभापती श्री.लक्ष्मण नाईक,दोडामार्ग नगरपंचायतचे बांधकाम सभापती श्री.नितीन मणेरीकर, माजी तालुका अध्यक्ष श्री.रंगनाथ गवस,शाणी बोर्डेकर , सौ.आकांशा शेटकर, सुमित म्हाडगुत, श्री.चिरमुले सर आणी खेळाडू उपस्थित होते.