‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी

‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे एकूण बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे घेण्यात आली. यामध्ये इयत्ता ५ वी तील ‘ कु. रौनक पवार ‘, इयत्ता ३ री तील ‘ कु. गिरिजा चव्हाण’ व ‘ कु. हार्दिक पवार’ या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ५ वी तील ‘ कु. अस्मि प्रभू तेंडोलकर’ व इयत्ता ४ थी तील ‘ कु. किमया पोटे ‘ या विद्यार्थ्यांनी ‘ रौप्य पदक प्राप्त केले. तर, इयत्ता ५ वी तील ‘ कु. हिना सारंग ‘ व ‘ कु. आराध्य नाटेकर ‘ , इयत्ता ३ री तील ‘ कु. यज्ञेश पवार ‘ या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले. वरील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कराटे शिक्षक ‘ श्री. दिनेश जाधव’ सरांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका ‘सौ. दिशा कामत’ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.