नेत्र व रक्त तपासणी शिबिरात ११७ जणांची तपासणी

मालवण,दि.२८ जानेवारी

अलर्ट सिटीजन फोरम (रजि.) मुंबई या संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेसह मालवण येथील आस्था ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण भरड भाट येथे आयोजित नेत्र व रक्त तपासणी शिबिराचा ११७ गरजू व्यक्तींनी लाभ घेतला.

या शिबिराचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते झाले. यावेळी रुजारिओ पिंटो, फादर फ्रँकलीन भांडिया, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर खजिनदार बंटी केनवडेकर, अगोस्तीन डिसोजा, रवी मिटकर, जेम्स फर्नांडिस, सायमन डिसोजा, रेजिना डिसोजा, जस्मिन फर्नांडिस, फुला लोबो, पेरपेद फर्नांडिस आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जेम्स फर्नांडिस यांनी केले.

या शिबिरात ६४ जणांची नेत्र तपासणी व ५३ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीसाठी विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे संदीप कदम व रक्त तपासणी साठी कोकण कला व शिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या वतीने सौ. पूजा नितीन चव्हाण यांचे सहकार्य लाभले. यावेळी अगोस्तीन डिसोजा यांनी अलर्ट सिटीजन फोरम या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. व्हिक्टर डान्टस यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी अलर्ट सिटीजन फोरम संस्थेतर्फे आस्था ग्रुपला व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते सुवर्णपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अंतोन फर्नांडिस यांनी आभार मानले.