सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे ४ रोजी वार्षिक अधिवेशन

मालवण,दि.२८ जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन नगरवाचन मंदिर, श्री शिवाजी वाचन मंदिर, सानेगुरुजी वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी दि. ४ फेब्रुवारी रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यानिमित्ताने सकाळी ९ ते ९.३० यावेळेत ग्रंथदिंडी श्री दत्त मंदिर भरड मालवण व्हाया हरिहरेश्वर मंदिर ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी निघणार आहे. या अधिवेशनासाठी उद्द्घाटक म्हणून माजी खासदार नीलेश राणे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग सचिन हजारे उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते २.३० वाजता द्वितीय सत्रामध्ये खुले अधिवेशन, दुपारी २.३० ते ३ वाजता कवी संमेलन व दुपारी ३.३० ते ५ वाजता मालवण तालुका ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम व अधिवेशनाची सांगता पसायदानाने होणार आहे. या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व ग्रंथालयातील सर्व पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व आयोजक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.