जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत देवगड टीम बाजी मारण्यासाठी सज्ज -गटविकास अधिकारी वृक्षाली यादव
देवगड,दि.२८ जानेवारी
पंचायत समिती देवगड आयोजित क्रिडा स्पर्धा गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ .म. ग . हायस्कुल देवगड येथे संपन्न झाली .
या स्पधेचे उदघाटन प्रमुख अतिथी माजी सभापती. सुनिल पारकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर कक्ष अधिकारी संतोष बिर्जे ,अधिक्षक मेधा राणे , लेखाधिकारी रमेश उपलवार , कृषि अधिकारी दिगंबर खराडे , वरीष्ट सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , पंच आनंद जाधव , सचिन जाधव , ग्रामसेवक पाडुरंग शेटगे आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पधेत पंच म्हणून कबड्डीसाठी विनायक सांगळे , प्रकाश वाडकर , क्रिकेटसाठी रमेश चव्हाण , खोखो साठी लहू दहिफळे ,लंगडीसाठी मधुसुदन घोडे , राहुल सातपुते , गोळा फेकसाठी आनंद जाधव , भालाफेकसाठी सुनिल कोदले , थाळी फेकसाठी संजय पाटील , हॉलीबॉलसाठी राहुल सातपुते , प्रकाश तिर्लोटकर , रस्सीखेच साठी प्रकाश तिर्लोटकर , सचिन घाडी , धावणेसाठी अशोक जाधव , नामदेव सावंत यांनी काम पाहिल .
यावेळी स्पधेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल माजी सभापती पंचायत समिती देवगड सुनिल पारकर यांनी पंचायत समिती देवगडच कौतुक करत स्पर्धकांना व विजयी संघाना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या .
या क्रिडा स्पर्धा संपल्यानंतर पंचायत समिती देवगडमध्ये गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव यांनी जिल्हास्तरीय स्पधेसाठी सुक्ष्म नियोजन करत विजेत्या स्पर्धकाच व विजेत्या संघाचे अभिनंदन करत शुभेच्छापर मार्गदर्शन करताना म्हणाले कि सांघिक खेळ करून जिल्हा क्रिडा स्पधेतही बाजी मारून देवगड संघ चॅम्पियन व्हावा अशी आशा व्यक्त केली .