अंधेरीत २ व ३ मार्चला ला महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन

कणकवली दि.२८ जानेवारी 
कराटे-डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप, २०२४ स्पर्धेचे आयोजन शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३ येथे दि. २ व ३ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
    सदर स्पर्धा कॅडेट (१४-१५ वर्ष), ज्युनिअर (१६-१७ वर्ष), २१ खालील (१८,१९ व २०वर्ष) व वरिष्ठ (२१ वर्षांवरील) वयोगटात वजनानुसार खेळविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू मे महिन्यात देहरादून, उत्तराखंड येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
कराटे-डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) ही राज्य संघटना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO) या राष्ट्रीय कराटे संघटनेची मान्यता प्राप्त सभासद असून ही राष्ट्रीय संघटना साउथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन (CKF), एशियन कराटे फेडरेशन (AKF) व वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) संघटनांची मान्यता सभासद असून वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) या संघटनेस इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी (IOC) या संघटनेची मान्यता आहे.
अधिक माहितीसाठी सर्व खेळाडूंनी जिल्हा संघटनेशी किंवा राज्य संघटनेचे सचिव संदीप म. गाडे यांच्याशी ९८९२१५२१९७ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन एशियन कराटे फेडरेशन मान्यताप्राप्त प्रशिक्षक तथा KAM चे सचिव सिहान संदीप गाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.