कोकणातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सह्यांची मोहीम

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी 
कोकणातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर कोकणासाठी रेल्वे गाड्या सोडल्या जाव्यात म्हणून सह्यांची मोहीम सुनील उतेकर यांनी राबविली जाते.

आज रविवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत कल्याण येथे कल्याण शहरात कोकणात जास्ती जास्त रेल्वे गाड्या सोडण्यासाठी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि. संस्थापक अध्यक्ष श्री सुनील उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
सह्यांच्या मोहिमेमध्ये कल्याण मधील नागरिक प्रवाशांनी भरघोस पाठिंबा दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत सदाशिव परब, अनिल गायकवाड,शंकर पेंडुरकर,राजेंद्र गावडे, प्रवीण टोले,संतोष मोरे ,विजय सुर्वे, सुधिर गोवळकर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश भारती,पंकज डोईफोडे, मनोज गोस्वामी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते
हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नियोजन करून पार पडला अशी माहिती सुनील उतेकर यांनी दिली. वेळात वेळ काडून मोहीमेत सामील झालेल्या सर्वांचे आभार व धन्यवाद मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.