शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जन संवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती..

कणकवली दि.२८ जानेवारी(भगवान लोके)

शिवसेना पक्ष प्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांचे स्वागत ठिकठिकाणी करणार आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याची माहिती शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते ,विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे ,बाळा गावडे,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,भाई गोवेकर,संदीप कदम,राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

४ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मोपा विमानतळ येथून सावंतवाडी ११ वाजता येथे गांधी चौक येथे आल्यावर स्वागत होणार आहे.दुपारी १२.४० वाजता कुडाळ हॉटेल आरएनएस ते कुडाळ भव्य रॅली काढण्यात येणार आहे.त्यानंतर कुडाळ शहरात भव्य स्वागत होणार आहे.त्यानंतर ओरोस येथे स्वागत होईल.काही वेळ हॉटेल मथुरा गंगाई येथे मुक्काम असेल.

दुपारी २ वाजता मालवणकडे प्रयाण होईल,तिथे मालवण किल्ला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे आगमन होईल. शिवाजी महाराज सिहासन लोकार्पण सोहळा होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा किल्ल्यावर नागरिकांनी भेट असणार आहे.त्यानंतर बंदरावर जातील तिथे स्वागत केले जाणार आहे.सायंकाळी ४.४५ वाजता आंगणेवाडी भराडी मातेचे दर्शन त्यानंतर नागरिकांच्यावतीने त्यांचे स्वागत होईल. तोक्ते वादळ झाले त्यावेळी शासनाच्यावतीने केलेल्या मदतीबद्दल मालवण मधील मच्छीमारांच्या वतीने स्वागत होईल.त्यानंतर कणकवलीत भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे.कणकवली देवगड वैभववाडी शिवसैनिक या ठिकाणी भव्य स्वागत करणार आहेत.त्यानंतर उध्दव ठाकरे सायंकाळी ५.३० वाजता आ.वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आगमन आणि मुक्काम होणार आहे.

शिवसैनिकांच्यावतीने उध्दव ठाकरे यांचे ५ फेब्रुवारी रोजी तळेरे येथे सकाळी स्वागत होणार आहे.त्याच्या दौऱ्यानिमित कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण आहे,मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर पहिलाच दौरा आहे.शिवसेना ,युवासेना आणि महिला आघाडी सर्व सेल एकत्रित त्याचा दौरा यशस्वी करणार आहेत.प्रत्येक शिवसैनिकाना येणारी आव्हाने पेलण्यासाठी त्यांचा दौरा महत्वाचा आहे.या मतदार संघाचे खा.विनायक राऊत ,आ.वैभव नाईक,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आणि सर्व नेते या दौऱ्यात असणार आहेत.काही पक्ष प्रवेश होतील,त्याची जबाबदारी विविध नेत्यांवर देण्यात आली आहे,असेही संदेश पारकर यांनी सांगितले.