कणकवली दि.२८ जानेवारी(भगवान लोके)
वागदे मांगरवाडी येथील सार्वजनिक विहिरीत अरुण धोंडू गोसावी(५२)यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
अरुण गोसावी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते. रात्री ते घरी परतले नाहीत.त्यामुळे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते.रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत त्यांचे भाऊ सुनील गोसावी यांना आढळून आला.त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.दरम्यान, अरुण गोसावी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र,त्यांचा अपघाती मृत्यू झाला की अन्य काही कारण आहे ते पोलिस तपासात उघड होईल.