रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहर यांच्यावतीने ३० जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित

देवगड,दि .२८ जानेवारी
रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहर यांच्यावतीने मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा देवगड जामसंडे नगरपंचायत बालोद्यान एसटी स्टँड समोर या ठिकाणी आयोजित केली आहे. यानिमित्त दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजलेपासून सुश्राव्य भजने संपन्न होणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहर यांनी केले आहे.