सावंतवाडी,दि .२८ जानेवारी
सावंतवाडी सकल मराठा समाज म्हणून कार्यरत राहून समाजाचासाठी काम करत राहणार असून संघटना नोंदणी केली जाईल तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी आमची आहे,अशी माहिती सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली.यावेळी पुरस्कार जाहीर झाल्याने प्रा सतीश बागवे व पत्रकार राजू तावडे यांचा समाजाच्या वतीने राघोजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा पासून स्थापन झालेल्या सकल मराठा समाज मराठ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सकल मराठा समाज झेंड्याखालीच काम करण्याचे राज्य समन्वयकांच्या सूचनेनुसार ठरविण्यात आले व सर्वांनुमते सकल मराठा समाजाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सिताराम गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचा ठराव माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी मांडला त्याला उपस्थित सर्वांनी हात उंचावून अनुमोदन दिले.
यावेळी सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक,सचिव आकाश मिसाळ राघोजी सावंत, सुभाष गावडे, उमाकांत वारंग, विलास जाधव, सतीश बागवे,बंटी माठेकर ,राजू तावडे, नारायण राणे,सागर गावडे, अमित परब,समीर पाटकर वैभव माठेकर,दिपक सावंत,विजय पवार, महादेव राऊळ,सुंदर गावडे,विठृठल दळवी, ओंकार सावंत, दत्ताराम सावंत,केशव नाईक,कुणाल सावंत, सुरेश गावडे,आनंद नाईक, सदाशिव सावंत, प्रकाश म्हाडगूत,सिध्दांत परब, प्रकाश परब,सदा,नाईक,विठ्ठल दळवी, अभिमन्यू लोंढे,विजय देसाई ,गोविंद सावंत,सचिन बिरोडकर,आदि उपस्थित होते
यावेळी सिताराम गावडे म्हणाले मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलन यश आले आहे मात्र सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही त्यासाठी संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे सध्या सर्वेक्षण सुरू आहे त्याबाबतही प्रत्येक मराठ्याने योग्य पद्धतीने सर्वेक्षणात आपली माहिती दिली पाहिजे तसेच मराठी क्रांती मोर्चा नंतर सकल मराठा समाज याच बॅनरखाली सावंतवाडी मध्ये सुरू झालेले काम यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू ठेवले जाईल राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाचे काम करताना सल्लागार म्हणून भूमिका घ्यावी असे यापूर्वी ठरलेले होते आणि पलीकडे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेऊन समाजासाठी काम करा व सकल मराठा समाजाच्या झेंडा अखंड ठेवावा यासाठी यापुढे काम केले जाईल संस्था नोंदणी करून बँक खाते देखील उघडले जाईल आणि प्रत्येकाला त्याचे प्रत्येक मराठा समाजाच्या दानशूर व्यक्तीने त्यासाठी सहकार्य करावयाचे आज जाहीर केले आहे त्यांचे निश्चितच आम्ही आभार मानतो असे गावडे यांनी स्पष्ट केले.