भिडे गुरुजींची आमदार नितेश राणे यांनी भेट घेवून घेतले शुभाशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडकोट मोहिमेचा झाला समारोप

कणकवली दि .२८ जानेवारी (भगवान लोके)
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेचा समारोप प्रतापगडाच्या पायथ्याशी विशेष कार्यक्रमाने संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांची भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले.
३९ व्या गडकोट मोहिमेचा समारोप प्रतापगडाच्या पायथ्याशी एका विशेष आणि भव्य दिव्य कार्यक्रमाने करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भाजपचे प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शिवप्रतिष्ठानचे हजारो धारकरी राज्यभरातून उपस्थित होते.