छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर निर्भय बनोचे सेनापती झाले असते -ॲड. असिम सरोदे

खोटारडेपणाचा कळस करणारे नेते म्हणजे नरेंद्र मोदी;भ्रष्ट माणसाबद्दल राग आणि चीड असणं हे राष्ट्रहिताचे लक्षण

कणकवली २८ जानेवारी (भगवान लोके)
छत्रपती शिवाजी महाराज असते तर निर्भय बनोचे सेनापती झाले असते.आम्ही त्यांच्या विचारांवर आधारित काम करीत आहोत.आज
अनेक न्यायाधीश धडधडीत असत्य न्याय देण्याचे काम करीत आहेत.वकील का बोलत नाहीत ?हे चुकीचे आहे. अनेक वकिलांनी सहभाग घेतला पाहिजे.जे समाजासाठी काम करतात त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जातात.नारायण राणे यांनी स्वतःचे हॉस्पिटल चालण्यासाठी सरकारी रुग्णालये बंद पडण्याची वेळ आणली.आता त्या नेत्यांबद्दल लोकांनी विचार करायची वेळ आली आहे.भ्रष्ट माणसाबद्दल राग आणि चीड असणं हे राष्ट्र हिताचे लक्षण आहे.२०२४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाडायचे आहे.खोटारडेपणाचा कळस करणारे नेते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत.असा आरोप मानवी हक्क ,संविधान विश्लेषक ॲड. असिम सरोदे यांनी केले.

कणकवली येथे निर्भय बनो सभेत
ॲड. असिम सरोदे बोलत होते .यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते , विचारवंत व पर्यावरण तज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर उपस्थित होत्या.

ॲड. असिम सरोदे म्हणाले,शास्त्रज्ञ समोर हे मोदी खोटं बोलतात हे दिसून आले आहे.मे मिडिया समोर काय पण बोलण्याचे काहींना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे,त्यात तुमच्याकडे एक जण आहे.जो माणूस पदावर बसून चुकीचे करतो,त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार आहे.निर्भय बनो ही चळवळ आहे,नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध नाही तर त्यांच्या प्रवृत्तींना आहे.

वैभव नाईक यांच्या कुटुंबाने काय सहन केलं, हे बाकीच्यांना समजणार नाही.हिंसा आणि भाजपाचे नाते जवळचे आहे.भाजपाने लोकशाहीची हत्या करायला सुरु केली आहे. भ्रष्ट्राचार आणि हिसेवर चालणारा भाजप पक्ष आहे.आता भारतीय नागरिक म्हणून बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे.
तिरंग्या बद्दल आणि राष्ट्रपित्याबद्दल
केव्हाच सन्मान नाही.आम.नितेश राणे यांच्याशी फारसा संबंध नाही.मात्र पर्ससीन विषयात चर्चा केली.तेव्हा त्यांची प्रवृत्ती चांगली होती .काँग्रेसमध्ये असताना चांगले बोलत होते मात्र भाजपमध्ये
आता त्यांची प्रवृत्ती बदलली आहे.ते स्वतःमध्ये बदल करीत नसतील तर त्यांना बदलायला लोक तयार आहेत.

भाजपाला संविधान मान्य नाही का? डॉ.बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत का? तर नेता बनायची लायकी नाही.भारतात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे दोन नेते
राजकारण बदलू शकतात.मोदींनी गेल्या ९ वर्षात केव्हाच प्रेस घेतली नाही.माणसाच्या भुकेची काळजी नाही,आपल्याला असवेदनशिल नेत्यांची गरज नाही.

राम यांनीच आणले असे देशात भाजपावाले वागले.नितेश राणे हे नेते बनले आहे.हिंदू मुस्लिम कलह निर्माण करुन हा गैरसमज दूर करा.जर कॉन्ट्रॅक्ट दिलं सेल तर सोडा.छत्रपती शिवाजी महाराज असते तर निर्भय बनोचे सेनापती झाले असते.आम्ही त्यांच्या विचारांवर आधारित काम करीत आहोत.समुद्राची नासधूस करुन पर्यावरणाची हानी करून तो पुतळा नको.शिवाजी महाराजांच्या नावे तुम्ही राजकारण करता.माझ्या नावाने नितेश राणेंनी गैरसमज पसरवू नका.मी ते सहन करणार नाही.माझ्या वडीलानी जेल भोगले आहे.त्यांचाच डीएनए माझ्या रक्तात आहे.
काँग्रेस मुक्त भारत हिंसक कल्पना आहे.भविष्यात सगळ्या पक्षासोबत भाजपा असलाच पाहिजे.कारण यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो ते समजेल.
भाजप ही काँग्रेस युक्त झाली आहे.त्यामुळे मोदी आणि शहा यांचा उल्लेख चारित्र्यहनन करणारे नेतृत्व म्हणून केलं पाहिजे.संसदेतून 150 खासदारांना निलंबित केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी ही राज्यात कीड लावली.शिवसेना मुळ राजकीय पक्ष आहे, त्याचा नेता व्हीप बजावू शकतो.राहुल नार्वेकर हे अध्यक्ष असल्याने संविधान चौकटीत राहून निर्णय व्हावा.मात्र,अत्यंत कायद्याचा अपमान करणारा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला.राज्यातील जनतेने पाडायचे ठरवले आहे,याचा अलर्ट फडणवीस,शिंदे यांनी घेतला पाहिजे.
भारताचे कर्ज वाढले आहेत,मोदी 36 देश फिरले कोट्यवधी रुपये खर्च केला.करोडो रुपये बुडवून गेले त्यांना केव्हा आणणार? ईव्हीएम निवडक पद्धतीने वापर केला जातो.ईव्हीएमला सर्वात प्रथम विरोध लालकृष्ण अडवाणी यांनी केला होता.
जनतेचे आरोपपत्र आहे मोदींनी भ्रष्ट नेत्यांना सोबत घेऊन राजकारण चालू ठेवले आहे,हे लोकशाहीला घातक आहे.चुकीचे लॉकडाऊन करत नुकसान केलं.शेतकरी आंदोलन करणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवले आहे.राष्ट्रध्वज हा महत्वाचा आहे,बाकीचे झेंडे घरामध्ये लावा.

सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर म्हणाल्या,वैभव नाईक यांच्या सारखे आमदार या इडीला न घाबरता खंबीर राहिले आहेत.मोदी हे बोलका शंख आहे,१५ लाख रुपये खात्यात जमा झाले का?बोलक्या पोपटाला घरात बसविण्याची वेळ आली आहे.