सिंधुदुर्ग 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग…

जामसंडे येथील नागरी सुविधा केंद्र खुले केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त…

देवगड,दि.२९ जानेवारी (गणेश आचरेकर)

देवगड-जामसांडे नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले जामसंडे येथील नागरी सुविधा केंद्र कर्मचाऱ्यान अभावी बंद असल्याच्या मथळ्याखाली सिंधुदुर्ग 24 तासाने बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आल्यानंतर सोमवारी नागरी सुविधा केंद्र खुले केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना घरपट्टी,पाणीपट्टी भरणा करण्यासाठी जामसंडे येथे नागरी सुविधा केंद्र आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार आणि गुरुवार या दिवशी सुरू करण्यात आले होते. मात्र गुरुवारी नागरी सुविधा केंद्र बंद असल्याचे बातमी सिंधुदुर्ग 24 तासाने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासना जाग आली आणि सोमवारी नागरिक सुविधा केंद्र घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यासाठी खुले करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.परंतु कर्मचाऱ्यान अभावी नागरी सुविधा केंद्र बंद ठेवू नये तसेच देवगड येथील नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयात आम्हाला जाणे शक्य होत नाही तसेच आर्थिक भूदंड सोसावा लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी आठवड्यातून ठरवून दिलेल्या सोमवार व गुरुवारी नागरिक सुविधा केंद्र सुरू ठेवावे अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.