श्री स्वामी समर्थ पादुका परिक्रमेचे ३१ जानेवारी रोजी मिठबाव येथे आगमन!

देवगड,दि.२९ जानेवारी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचे मार्फत बुधवार दि ३१ जाने.२०२४ रोजी श्री पालखी परीक्रमा आगमन स.१० वा. श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथे होणार आहे .यानिमित्त दि.३० व ३१ जाने.२०२४ या दोन दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.यात मंगळवार दि.३० जाने.रोजी स.८ ते १२रामयज्ञ दु.१२ ते १२.३० ,आरती मंत्रपुष्प,१२.३० ते ३.०० प्रसाद,बुधवार दि.३१ जाने.स.१० वा. श्री चे पालखीचे आगमन,मिरवणूक,पूजा आरती,दु.१२ ते ३ महाप्रसाद,साय.४ वा. पालखीचे प्रस्थान या सोहळ्यात सहभागी व्हावे व आर्थिक पुण्यदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मिठबाव यांनी केले आहे.