भाजपाचा कार्यकर्ता देशद्रोही भूमिका घेत असल्याचा पर्दापाश आम्ही केला – आ.वैभव नाईक

आ.नितेश राणे यांच्याकडून हिंदुत्वाची भूमिका मतांसाठी ; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याच्या पाठीशी कोण?

कणकवली दि.२९ जानेवारी(भगवान लोके)

महाराष्ट्रात हिंदुत्वाची भूमिका घेवून भाजपा आ. नितेश राणे हे फिरण्याचा प्रयत्न करत आहेत. आ.नितेश राणे यांच्याकडून हिंदुत्वाची भूमिका मतांसाठी घेतली जात आहे.कणकवलीत भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या एकाने धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवत देशद्रोहीपणाची भूमिका घेत असल्याचा पर्दापाश आम्ही केला.धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याच्या पाठीशी कोण? यासाठी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत. नितेश राणे आपल्याबरोबर असलेला मुस्लिम देशप्रेमी आणि आपल्याबरोबर नसला तर तो देशद्रोही अशी भूमिका असल्याचा आरोप आ.वैभव नाईक यांनी केला.

कणकवली येथील विजय भवन कार्यालयात माध्यमांशी आ. वैभव नाईक यांनी संवाद साधला.

आपल्याच कार्यकर्त्यांचा वापर करून हा धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे करत आहेत की काय? याची चौकशी व्हावी.हे मतांसाठी करत असल्याचे काल उघड झाले आहे. त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असल्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवला होता आणि तो त्यांचाच कार्यकर्ता होता हे आम्ही सिध्द केले. सकाळी त्याच्या विरोधात आंदोलन झाले आणि सायंकाळी त्यालाच घेवून पोलिस स्टेशनवर जाण्याचे काम आ. नितेश राणे यांनी केले. त्यामुळे हे फक्त राजकारण करत आहेत. त्याचा पर्दापाश आम्ही काल केलेला आहे.सिंधुदुर्गातील सर्वच मुस्लिम बांधव हे देशप्रेमी आहेत. परंतु त्यांचाच कार्यकर्ता असलेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दामहून करत असल्याचे आढळून आले.सिंधुदुर्गात धार्मिक निर्माण तेढ करण्यासाठीचा प्रयत्न भाजपचेच कार्यकर्ते मुद्दामहून करत असून त्याला आ. नितेश राणे यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

पहिल्यांदा ना.राणे,ना.भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडावे..

केंद्रीयमंत्री नारायण राणे व कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी अगोदर महायुती सत्तेतून बाहेर पडावे व नंतरच अशा भूमिका मांडाव्यात. मराठा आरक्षणाविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य ही जनतेची दिशाभूल करणारी आहेत,असा टोला आ. वैभव नाईक यांनी लगावला.

रत्नागिरी येथे आ. भास्कर जाधव यांच्या विषयी माजी खा. निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्य चुकीचे आहे.तुमच्या वडिलांसोबत आमदार असलेल्या जेष्ठ आ.जाधव यांच्याबद्दल बोलताना त्यांनी विचार करावा.त्यांनी आपली काय ताकद आहे हे मागील दोन लोकसभा निवडणूकीत दाखवली असल्याचा टोला आ.वैभव नाईक यांनी लगावला.