महाराष्ट्र स्टुडंट्स इनोवेशन चॅलेंज या स्पर्धेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभववाडीचे यश

सावंतवाडी दि.२९ जानेवारी 
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी मधील वीजतंत्री विभागातील प्रशिक्षणार्थी कु. दीपेश दळवी व कु.मंदार परब यांना महाराष्ट्र स्टुडंट्स इनोवेशन चॅलेंज या स्पर्धेमध्ये त्यांनी तयार केलेल्या फिल्ड प्रोटेक्टर या शेतीचे प्राण्यांपासून संरक्षणासाठी तयार केलेल्या प्रोजेक्ट करिता पारितोषिक प्राप्त झाले
सदर पारितोषकाची रक्कम रुपये एक लाख व प्रमाणपत्र प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सदर स्पर्धा महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन यांनी आयोजित केली होती ही स्पर्धा प्रथम संस्था स्तरावर घेण्यात आली याकरिता परीक्षक म्हणून श्री योगेश महाडिक सर सीनियर लेक्चर पॉलिटेक्निक मालवण यांनी काम पाहिले
या स्पर्धेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभववाडी मधील तीन प्रोजेक्ट सादर करण्यात आले त्यामध्ये फिल्ड प्रोटेक्टर हा प्रोजेक्ट निवडण्यात आला नंतर जिल्हास्तरावर दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज, महाविद्यालय तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला जिल्हास्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण व अचूक मॉडेलच्या जोरावर कु.दीपेश दळवी व कु. मंदार परब यांनी दैदीप्यमान यश संपादन केले
सदर प्रोजेक्ट करिता शिल्प निदेशक श्री अमोल राणे , प्राचार्य श्री नितीन पिंडकुरवार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभववाडी तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले