पहीले महीला मार्तंड ढोल ताशा ध्वज पथक विरार यांच्या मार्गदर्शना खाली कुणकेश्वर हायस्कूल येथे

देवगड,दि.२९ जानेवारी
सिंधु संजिवनसंस्थे मार्फत देवगड तालुक्यातील पहीले महीला ढोल ताशा पथक मार्तंड ढोल ताशा ध्वज पथक विरार यांच्या मार्गदर्शना खाली कुणकेश्वर हायस्कूल येथे तयार होत आहे. या पथकाच्या सरावाला शिवसेना तालुका प्रमुख अमोल लोके , सोबत मिठबांव हायस्कुलच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीनी सौ.प्रीती सारंग मुख्याध्यापिका ब्राईट अँजेल इंग्लिश स्कूल, सौ.तनुजा गावडे. फार्मासिस्ट पुणे,, सौ.ममता जोगल. ,विषयतज्ञ, सौ.विनोदीनी सावंत.यश प्रॉडक्ट्स संचालिका, सौ.मनीषा हिंदळेकर फॅशन डिझाइनर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी सदिच्छ भेट दिली तसेच यावेळी कुणकेश्वर गावाचे उद्योजक प्रमोद आंबेरकर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी महीलांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .महीला ढोल ताशा पथका तर्फे या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. मान्यवरांनी ढोलावर ठेका देत ढोल वाजविण्याचा आनंद देखील यावेळी लुटला.