पर्यटन विकास वाढीसाठी अशा स्वछता मोहिमांची गरज — तहसीलदार देशपांडे

……तरच स्वछ आणि सुंदर जिल्हा म्हणून ओळख मिळेल

फोंडाघाट,दि.२९ जानेवारी (संजय सावंत)
आज फोंडा घाट या ठिकाणी गणेश जेठे आणि मित्रपरिवार यांच्या वतीने जे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश जात आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन अशा प्रकारे स्वच्छता करत आहेत आणि असा संदेश संपूर्ण तालुका जिल्हाभर गेला पाहिजे कारण या अशा स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपल्या पर्यटन जिल्ह्याला स्वच्छ सुंदर जिल्हा म्हणून ओळख मिळेल व येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन विकास वाढीस लागेल याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा स्वच्छता मोहिमांची फार गरज आहे. असा मौलिक संदेश तालुका तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिला,ते आज फोंडाघाट याठिकाणी गणेश जेठे मित्रपरिवार,फोंडाघाट ग्रामपंचायत, फोंडाघाट पत्रकार संघ, वैभववाडी करुळ येथील सह्याद्री जिवरक्षक संघटना व फोंडाघाट महाविद्यालय एन सी सी विभाग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या फोंडा घाट स्वछता मोहिमे प्रसंगी बोलत होते.
दरम्यान यावेळी फोंडाघाटच्या सरपंच सौ संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता के के प्रभू, पत्रकार गणेश जेठे मंडल अधिकारी दिलीप पाटील,सह्याद्री जिवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील,भैया कदम व अन्य सहकारी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पवार ,अशोक चव्हाण ,शैलेंद्र कांबळे, संदेश घाणेकर, शर्मिला पराडकर, आनंद तळवडेकर नितीन साटम व अन्य कर्मचारी,फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राध्यापक सुरवसे, प्राध्यापक जगदीश राणे, एन सी सी प्रमुख प्राध्यापक ताडेराव प्राध्यापक रायबोले, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, मैत्री दुखंडे,फोंडाघाट ग्राम विकास अधिकारी विलास कोलते ग्रामपंचायत सदस्या प्राची धुरी,पत्रकार मोहन पडवळ , संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरु सावंत, अनिल मेस्त्री, मुंबई पोर्ट ट्रस्ट चे अनिल कामतेकर, सुरेंद्र जळगावकर, जितेंद्र सावंत, ज्ञानदेव बांदकर,आरोग्य विभाग कर्मचारी दीपक इस्वलकर ,निलेश मेस्त्री,सत्यवान साटम, विजय जामदार, विश्वनाथ जाधव सिद्धेश मोडकर स्वच्छतेचा ब्रँड अँबेसिडर रोहित मोंडकर प्रियंका मोंडकर कोमल जोईल कस्तुरी तिरोडकर व फोंडाघाट महाविद्यालीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सह जवळ पास 80 ते 90 नागरिकांनी आज या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीलाच गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेबाबत शपथ दिली.यांनंतर राष्ट्र गीत झाल्यानंतर स्वछता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने दोन टीम करून अर्ध्या टीम ने फोंडाघाट च्या मध्या पासून घाटाच्या वरच्या भागातील दाजीपूर खिंडी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता केली तर अर्ध्या टीम ने घाटाच्या खालच्या बाजूस अगदी घाटाच्या पायथ्यापर्यंत स्वछता केली. यावेळी सुमारे 10 ते 15 मोठ्या प्लास्टिक पिशव्या भरून व ग्रामपंचायत ने पाठविलेली कचरा गाडी पूर्ण भरून प्लास्टिक पिशव्या,बॉटल व इतर कचरा जमा झाला .
सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत चाललेल्या या फोंडा घाट स्वच्छता मोहिमे वेळी येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरील वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून चालू असलेल्या कार्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व यापुढे आपणही कोठेही जाताना प्लास्टिक बॉटल किंवा कागद आपण बाहेर फेकणार नसल्याची यावेळी ग्वाही दिली. आज या स्वच्छता मोहिमेमध्ये फोंडाघाट,कणकवली,वैभववाडी,कोंडये, तरळा, खारेपाटण व आजू बाजूच्या परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.या स्वच्छता मोहिमेमुळे फोंडाघाट पूर्णपणे स्वच्छ आणी सुंदर झाला होता.