नूतन पो. नि. सुरेश ठाकूर गावित यांचे आचरा भाजपच्या वतीने स्वागत..!

आचरा,दि.२९ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
आचरा पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांची आचरा पोलीस स्टेशन येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा विभागीय भाजप कार्यकर्त्यांसह भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. शनिवारीच 27 जानेवारीला गावित यांनी आचरा पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारला आहे.
यावेळी खरेदी विक्री चेअरमन राजन गावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, पळसंब सरपंच महेश वरक, राजन पांगे, संजय गांधी निराधारचे बाबू परुळेकर, विजय(बाबू) कदम, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, मनोज हडकर, महेश वायगणकर, संजय लोके आदी उपस्थित होते.