उद्धव ठाकरे यांची सभा सावंतवाडी येथे ४ फेब्रुवारी रोजी गांधी चौकात

सावंतवाडी दि.२९ जानेवारी 
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावंतवाडी येथे दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर सभा गांधी चौकात होणार आहे. या सभेचे नियोजन तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आले. या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहावे म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले.

पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजनाची बैठक जिल्हाप्रमुख श्री संजय पडते, उपनेत्या तथा महिला जिल्हा संघटक सौ जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्री शैलेश परब, जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा, माजी सभापती रमेश गावकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी उप तालुका प्रमुख बाळू मालकर, राजू शेटकर, संदीप पांढरे, आबा सावंत, शहर प्रमुख शैलेश गावंढळकर, विभागप्रमुख आबा केरकर, सुनील गावडे, पुरषोत्तम राऊळ, नामदेव नाईक, फिलिप्स रॉडीक्स, गुंडू राऊत, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, संदेश केळकर आणि संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहावे म्हणून प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनीही उपस्थितीचे आवाहन केले