सिंधुदुर्ग जिल्हयातील कुणबी नोंद माहिती लवकरात लवकर शोधून ऑनलाईन करण्यात यावी-महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे

सावंतवाडी दि.२९ जानेवारी
सिंधुदुर्ग जिल्हयातील कुणबी नोंद माहिती लवकरात लवकर शोधून ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि न्यायमूर्ती शिंदे समितीला देखील निवेदन पाठविण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

गरजवंत मराठ्यांचा आरक्षणासाठीचा लढा सबंध महाराष्ट्रभर सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु आपला सिंधुदुर्ग जिल्हा या मध्ये सर्वात पिछाडीवर आहे. सर्वात कमी नोंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दिसत आहेत.
त्यामुळे आपल्या स्तरावरून जातीने लक्ष घालून, सर्व यंत्रणा प्रभावी पणे राबवून, सापडलेल्या व नवीन सापडणाऱ्या सर्व नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्याव्यात. “अन्यथा राष्ट्रवादी कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले आहे.
यावेळी पुंडलिक दळवी, पुजा दळवी व पदाधिकारी उपस्थित होते.