नमो भाजप चषक हाॅलीबाॅल स्पर्धेत शिवशक्ती मठ या संघाने विजेतेपद पटकावले

सावंतवाडी,दि.२९ जानेवारी
नमो भाजप चषक हाॅलीबाॅल स्पर्धेत शिवशक्ती मठ या संघाने विजेतेपद पटकावले तर साई गणेश उभादांडा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत माजी आमदार राजन तेली व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने वेंगुर्ले तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण करताना भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर भूषण सारंग,हेमंत गावडे,तुषार साळगावकर,बोवलेकर, साई भोई, ऋत्विक अंगचेकर,सॅमसन फर्नांडिस आदी मान्यवर व खेळाडू,त्यांचे पालक उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवशक्ती मठ या संघाने विजेतेपद पटकावले तर साई गणेश उभादांडा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.