औषध कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे चांगले काम – नंदू उबाळे

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या स्नेहमेळावा

कणकवली दि.२९ जानेवारी(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध कर्मचाऱ्यांची संघटना चांगले काम करीत आहे.औषध कर्मचाऱ्यांनी संवेदनशिल विभागात सेवा करतोय याचे भान राखावे.यापुढेही या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येवून विविध उपक्रम राबवावेत,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे माजी अध्यक्ष,उद्योजक नंदू उबाळे यांनी केले.

कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

नंदू उबाळे म्हणाले,औषध कर्मचारी संघटनेची काम आणि कार्य चांगले आहे. औषध कर्मचारी म्हणून आपण करत असलेल्या सामाजिक कार्य फार महत्वाचे आहे.या कर्मचाऱ्यांनी औषध व्यवसायात नव – नविन गोष्टी आत्मसात कराव्यात.

या स्नेहमेळाव्यात क्रिकेट स्पर्धा झाली.त्यात कणकवली तालुक्याने कुडाळ संघाला सलग पाचव्यांदा पराभव करीत विजेतपद पटकावले.सदर स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कणकवली संघाच्या अमित मनचेकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून कुडाळ संघाच्या योगेश सावंत यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला औषध व्यापारी उपस्थित होते.तसेच सर्वच ज्येष्ठ औषध कर्मचारी,सर्व तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कणकवली तालुक्याने अथक मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष समीर ठाकूर तर सूत्रसंचालन दीपक मेस्त्री, आभार सचिव अभिजित गुरव यांनी मानले.