देवगड,दि.२९ जानेवारी
कुवळे गावात आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून कुवळे घाडीवाडी पायवाट बांधणे -७लाख ,कुवळे भैरी मंदिर ते रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण -डांबरीकरण करणे -१० लाख ,जि.प.शाळा कुवळे छप्पर दुरुस्ती -१० लाख ,कुवळे भावई मंदिर रस्ता खडीकरण -डांबरीकरण करणे – ३ लाख अशी विविध कामे मंजूर करण्यात आली.या सर्व विकास कामांची अनुक्रमे भूमिपूजन भाजपा सरचिटणीस .संदीप साटम ,.मंगेश लोके ,उपसरपंच प्रथमेश प्रभुमीराशी ,बूथ अध्यक्ष पप्पू घाडी यांच्या शुभहस्ते पार पडली.या वेळी सरपंच सुभाष देसाई ,सुभाष नार्वेकर ,रत्नदीप कुवळेकर ,सुभाष थोरबोले ,अतुल परब ,विनायक लाड ,रामचंद्र लाड ,विनोद कुवळेकर ,एकनाथ लाड ,एकनाथ वायंगणकर ,संदेश लाड ,सचिन लाड ,उल्हास परब ,विजय दाभोलकर ,मनोहर घाडी ,सुयोग लाड ,नारायण लाड ,एकनाथ परब इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .विकास कामांना सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .
Home आपलं सिंधुदुर्ग आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांची भाजपा सरचिटणीस संदीप साटम...