कालवीबंदर येथे ९ ते १७ एप्रिलला सामाजिक नाट्य स्पर्धा

वेंगुर्ला,दि.२९ जानेवारी

नवतरुण उत्साही नाट्य, कला, क्रीडा मंडळ कालवीबंदर, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी व कालवी ग्रामस्थांतर्फे ९ ते १७ एप्रिल या कालावधीत विठ्ठल-रखुमाई मंदिर कालबीबंदर येथे सलग विसाव्या वर्षी सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित सामाजिक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या नाट्यसंघास २० हजार रुपये, द्वितीय व क्रमांकास १५ हजार रुपये, तृतीय १० हजार रुपये तसेच फिरता व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहे. तसेच या सामाजिक नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक संघास ७ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहेत.

या नाट्यस्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणा-या ७ नाट्य संघानाच सहभाग देण्यात येणार आहे. या सामाजिक नाट्य स्पर्धेत सहभाग घेणा-या नाट्य मंडळांनी ५ फेब्रुवारीपर्यंत नावे नोंदवावीत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष आपा ताम्हणकर (८२७५७७३५१४) येथे संफ साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.