प्रभू व जाधव यांचा दिल्लीत सन्मान

वेंगुर्ला,दि.२९ जानेवारी

केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या विभागातर्फे परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रजासत्ताक दिनी विशेष आमंत्रित म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रदिप प्रभू व स्वच्छता दूत प्रेमा जाधव यांचा दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय जल शक्ती विभागाचे मंत्री राजेंद्रसिंह शेखावत, राजीव चंद्रशेखर, विश्ववर ताडु यांसह अधिकारी उपस्थित होते. प्रेमा जाधव

यांच्या वयाचा मान राखत स्वच्छता विषयक कामाबाबत मान्यवर त्यांच्या समोर नतमस्तक झाले. संपूर्ण देशातील स्वच्छाग्रहीमधून आपल्याबरोबर व्यासपीठावर

बसण्याचा मान आम्हाला मिळाला. ही आमच्या कामाची पोचपावती असल्याचे प्रदिप प्रभू म्हणाले.