मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी ‘उडान -२०२४ महोत्सवाचे तळेरे येथे आयोजन

तळेरे,दि.२९ जानेवारी

तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उडान -२०२४ महोत्सवाचे आयोजन २ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील १७ महाविद्यालयांचा सहभाग होणार असून सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, पोवाडा, भाषण स्पर्धा, सृजनात्मक लेखन अशा स्पर्धा होणार आहेत.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप-परीसर समन्वयचे प्र.संचालक व महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलींग यांनी केले आहे.