लोप पावत चालेलल्या लोककलाचा प्रचार प्रसार करणे आवश्यक-युवराज लखम सावंत भोसले

लोककला महोत्सवाचे उदघाटन सौं शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते

सावंतवाडी,दि.२९ जानेवारी
सिंधुदुर्ग मधील स्थानिक लोककला आता शहरी भागात बघायला मिळत नाहीत. हल्लीच्या काळात लोप पावत चालेलल्या लोककलाचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे त्यांना राजघराण्याने व्यासपीठ मिळवून दिले . यापुढेही सावंतवाडीचे राजघराणे लोककला , दशावतार कलेला नेहमीचं सहकार्य करेल असे आश्वासन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले यांनी दिले.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी,वं सहयोग ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी राजवाडा येथे दरवर्षी प्रमाणे लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
लोककला महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.यां लोककला महोत्सवाचे उदघाटन सौं शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी युवराज लखम सावंत भोसले,
उद्योजक शामसूदंर  शिरोडकर, अँड श्यामराव सावंत, रामकृष्ण मसगे, एस ठाकूर, विलासिनी नाईक, अण्णा देसाई, एम बी कुलकर्णी, प्रा दिलीप गोडकर,प्रा गणेश मर्गज,प्रसिद्ध लोक कलावंत गणपत मसगे, श्री बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवराज पुढे म्हणाले, स्थानिक भागातील लोककला जिवंत ठेवण्याचे काम सावंतवाडीच्यां राजघराण्याने केले. पिंगुळी येथे ठाकर लोककलावताना आश्रय दिला त्यामुळेचं ही कला आज ही आपणास पहावयास मिळते.शहरी भागात लोककला बघायला मिळत नाही मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणात ही कला थोडंफार बघायला मिळते यांचे समाधान आहे. त्यामुळे सावंतवाडी राजघराणे यांनी नागरिकांसाठी एकाच व्यासपीठावर यां सगळ्या कला बघायला मिळाव्यात यां उद्देशाने असा महोत्सव घेण्यास सुरुवात केली.दिवगंत राजे साहेब शिवराम राजे भोसले हे महाराष्ट्र लोककला बोर्डाचे चेअरमन असताना यां लोक कलाना नवं संजीवनी मिळाली. यां कलाना उभारी देण्याचे काम राजे साहेब शिवराम राजे भोसले यांनी केले .

प्रा दिलीप गोडकर यांनी सहयोग ग्रामविकास मंडळ तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय यां दोन संस्थानी एकत्र येऊन अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरी भागात असे कार्यक्रम आता होत नाहीत मात्र इथे राजवाड्यात ते होत आहेत यांचे सौभाग्य येथील नागरिकांना आहे. कॉलेज विद्यार्थी ते शेतकरी बांधावर यां उपक्रमाला तसेच मंडळाने घेतेलेल्या वैदू मेळाव्याला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे यावेळी गोडकर म्हणाले.

यावेळी राणी साहेब सौं शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते उपस्थित लोककलावत यांचा शालं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथून फोन वरून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.लोककलाना राजश्रय मिळाला होता. आजही राजघराणे लोककला महोत्सव आयोजित करून प्रोत्साहन देत आहेत त्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

यावेळी दहा प्रसिद्ध लोककला राजवाडा येथे आयोजित महोतस्वात सादर करण्यात आल्या. त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.मोठ्या संख्येने नागरिकांनि यां कला पाहण्यासाठी राजवाड्यात गर्दी केली होती.