शिवडाव येथील वनिता केणी यांचे निधन

कणकवली दि.२९ जानेवारी

कणकवली तालुक्यातील शिवडाव ,ओटोसवाडी येथील रहिवासी
वनिता आप्पा केणी( ८२) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा उमठविला होता.त्यांच्या निधनाने शिवडाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातू असा परिवार आहे. लोकमतचे कर्मचारी सिताराम केणी यांच्या त्या मातोश्री तर अंगणवाडी सेविका संपदा केणी यांच्या त्या सासू होत.