निबंध स्पर्धेत वैदेही पाताडे, आर्या नाईक-साटम, योगेश चव्हाण प्रथम

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर..

कणकवली दि.२९ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यात 5 ते 8 वी गटात वैदेही शिवराम पाताडे (कासार्डे माध्यमिक विद्यालय), 9 वी ते 12 वी गटात आर्या अरुण नाईक-साटम (विद्यामंदिर, कणकवली) तर 13 वी ते खुल्या गटात योगेश गंगाराम चव्हाण (कणकवली) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार 4 फेब्रुवारी रोजी पिसेकामते मैत्री गार्डन येथे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात केले जाणार आहे.
कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना चालना देण्यासाठी दरवर्षी निबंधस्पर्धा घेतली जाते. यावर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेत तीन गट मिळून 18 पेक्षा अधिक शाळातील 42 विद्यार्थी आणि खुल्या गटात 7 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा सविस्तर निकालपुढीलप्रमाणे आहे. 5वी ते 8 वी गट – द्वितीय प्रांजल कृष्णा पाटील (जि. प. शाळा वाघेरी नं. 1), द्वितीय श्रेया प्रविण कदम (जि. प. शाळा), उत्तेजनार्थ प्रियांका प्रकाश शिंगे (वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे), उर्वी गुरुप्रसाद पाटील (कासार्डे विद्यालय). 9 वी ते 12 वी गट – द्वितीय निपूर्णा चारुहास आडकर (विद्यामंदिर कणकवली), तृतीय तयना प्रविण कदम (कलमठ), उत्तेजनार्थ गौरेश प्रमोद शिंदे (कासार्डे विद्यालय), मयुरी रामकृष्ण गुरव (माध्यमिक विद्यालय, बीडवाडी). 13 वी ते खुला गट – द्वितीय मानसी महेश वालावलकर (जानवली), तृतीय तन्मय धनंजय तळेकर (कासार्डे ज्यु. कॉलेज), उत्तेजनार्थ अर्पिता अशोक मोडकर (हरकुळ बुद्रुक), रितेश प्रभाकर वावळीये (कलमठ). तिन्ही गटात 49 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देवून गौरविले जाणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.