सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याचा शुभारंभ

बहुसंख्य व्यापारी बांधव व भगिनींनीच्या सहभागाने आणि व्यापारी एकजुटीचा नारा देत भव्य मोटारसायकल रॅली

मालवण,दि.२९ जानेवारी
बहुसंख्य व्यापारी बांधव व भगिनींनीच्या सहभागाने आणि व्यापारी एकजुटीचा नारा देत भव्य मोटारसायकल रॅली काढत आज मालवणात आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याचा शुभारंभ झाला. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोटारसायकल रॅलीची बोर्डिंग ग्राउंड येथील मुख्य कार्यक्रम स्थळी सांगता होऊन निलेश राणे यांच्या हस्ते मुख्य मंडप व स्टेजचे उदघाटन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा मालवण येथील बोर्डिंग मैदानावर २९, ३०, ३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होत असून असून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मालवण व्यापारी संघाच्या आयोजनाखाली हा मेळावा होत आहे. आज मालवण देऊळवाडा येथून माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बहुसंख्य व्यापारी व भगिनींच्या सहभागाने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. देऊळवाडा येथील भरड नाका मार्गे बाजारपेठ ते राजकोट किल्ला ते बोर्डिंग ग्राउंड मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत
उमेश नेरुरकर, प्रसाद पारकर, विजय केनवडेकर, दिपक पाटकर, अशोक सावंत, नितीन वाळके, नितीन तायशेटे, अरविंद नेवाळकर, महेश कांदळगावकर, परशुराम पाटकर, राजा शंकरदास, हर्षल बांदेकर, अभय कदम, विद्या मेस्त्री, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर, संजय गावडे, हर्षल केळुसकर, सचिन आरोलकर, मुकेश बावकर, बाळू अंधारी, धोंडी चिंदरकर, संदिप परब, स्मृती कांदळगावकर, सुरेखा वाळके, शांती पटेल आदी व इतर सहभागी झाले होते

रॅलीनंतर बोर्डिंग मैदानावर उभारण्यात आलेले स्टॉलचे उमेश नेरुरकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. तसेच मुख्य मंडप व स्टेजचे उदघाटन निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलेश राणे यांनी व्यापाऱ्यांसमवेत विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलधारकांना शुभेच्छा दिल्या.

या मेळाव्यानिमित्त ३० जानेवारीला महानाट्य ‘अयोध्या’ हे सादर होणार आहे. या दरम्यान व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन चर्चासत्रेही होणार आहेत. तर ३१ जानेवारीला मुख्य व्यापारी एकता मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव व गोवा येथून सुमारे ५००० व्यापारी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.