कणकवली दि.२९ जानेवारी(भगवान लोके)
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त धार्मिक,सांस्कृतिक तसेच भालचंद्र संस्थान व नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी ढालकाठी देवस्थान येथे ज्येष्ठ व्यापारी विजयकुमार वळंजू
यांच्या हस्ते करण्यात आला.या स्पर्धेच्या माध्यमातून घरोगोती सजावटीत सहभाग घेतल्याने भालचंद्र महाराज रोड,बाजारपेठेत सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारता दिवाळी सणाची आठवण आल्यावाचून राहत नाही . याची देही हेचि डोळा याचा प्रत्येय या निमित्ताने पाहवयास मिळत आहे.
यावेळी भालचंद्र महाराज संस्थानचे खजिनदार दादा नार्वेकर, विश्वस्त गजानन उपरकर विजय केळुसकर,उमेश वाळके,नागेश मुसळे अँड.प्रवीण पारकर, शशिकांत कसालकर,दीपक बेलवलकर राजू पारकर ,बाळू मोरये,अण्णा कोदे,भरत उबाळे काशिनाथ कसालकर, बंड्या पारकर, महेश कुडाळकर, बाळा पेडणेकर, संतोष पुजारे, प्रताप वाळके, मयूर पेडणेकर,गौरेश कसालकर, मनीष पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे.त्या मार्गावरील नागरिकांकरीता घर सजावट स्पर्धा घेण्यात येत आहे.या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून शहरात भक्तिमय वातावरना सोबतच शहर स्वच्छ सुंदर समाज प्रबोधन व्हावे. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.परीक्षक म्हणून अक्षय चिंदरकर व हनुमंत तांबट हे काम पाहत आहेत.सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.