जिल्ह्यात चौदाशे कुणबी नोंदी आहेत याचा लाभ जिल्ह्यातील २० हजार व्यक्तींना होणार

आणखी व्यक्तींना लाभ होण्यासाठी अखिल भारतीय मराठा संघ प्रयत्नशील राहणार- जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत 

सावंतवाडी,दि.३० जानेवारी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या मात्र काही जण जरांगे पाटील युद्धात जिंकले पण तहात हरले असे म्हणत आहेत परंतु हे चुकीचे आहे असून आंदोलनामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांबरोबर मराठा कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यात चौदाशे कुणबी नोंदी आहेत याचा लाभ जिल्ह्यातील २० हजार व्यक्तींना होणार आहे.आणखी व्यक्तींना लाभ होण्यासाठी अखिल भारतीय मराठा संघ प्रयत्नशील राहणार आहे तसेच मराठी कुणबी दाखले मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ तपासूनच कार्यरत झाला आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी दिली.

येथील राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत विकास सावंत पुंडलिक दळवी संजय लाड विशाल सावंत शिवदत्त घोगळे विनायक सावंत अभिजीत सावंत आदी उपस्थित होते.
ॲड सावंत यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाने ज्या मागण्या मान्य केल्या त्याबाबत विस्तृत माहिती दिली ते म्हणाले, शासनाने 24 जानेवारीला जो अध्यादेश काढला आहे त्यात इतर समाजाबरोबर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत फी माफी मध्येही सवलत मिळणार आहे त्याशिवाय मराठा कुणबी जात प्रमाणपत्राबाबत 26 जानेवारीला जो अध्यादेश काढला आहे त्यात सगे सोयरे नमूद करण्यात आले आहे त्यानुसार वडील आजोबा पणजोबा यांच्या काळात झालेल्या विवाह संबंधांच्या अनुषंगाने कुणबी दाखले मिळणार आहेत प्रथमच पत्नीच्या बाजूने जर कुणीबी जात नमूद असेल तर कुणबी दाखला मिळणार आहे त्याशिवाय आणखी नातेवाईक असतील तर त्या संबंधाने शोध घेऊन कुणबी दाखले मिळणार आहेत.जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे हे सर्व मराठा समाजाला प्राप्त झाले आहे याशिवाय गायकवाड समितीने मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरुटेपिटीशन दाखल आहे त्या संदर्भात काय निकाल लागतो त्यावर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौदाशे कुणबी नोंदी सापडले आहेत त्याचा तब्बल वीस हजार लोकांना फायदा होणार आहे जिल्ह्यात अद्यापही कुणबी नोंदी शोधण्याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नाही पूर्वीच्या नोंदी या मोडी लिपीत होत्या परंतु एकोणीसचे सालातील नोंद देवनागरी लिपीत कश्या असा सवाल उपस्थित केला. तसेच ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केल्या पाहिजे होत्या परंतु त्या अध्यापही करण्यात आलेल्या नाहीत त्या तात्काळ करण्यात याव्यात.
ते म्हणाले,अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मराठा आरक्षणा बरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत आगामी वीस दिवसात व्हेईकल एस्पो उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्या अंतर्गत मराठा समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल.कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मराठवाडा आणि विदर्भ साठी स्वतंत्र वैधानिक मंडळ असल्याने अनुक्रमे साडेचारशे आणि साडेपाचशे जागांचा कोटा मेडिकल जागांमध्ये तेथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. कोकणात हे विकास मंडळ स्थापन झाल्यास मेडिकल मध्ये कोकण साठी ज्यादा कोटा मिळणार आहे त्याचा लाभ कोकणातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे .
सकल मराठा आंदोलनाच्या वेळी ज्या सिंधुदुर्गातील मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे दीपक केसरकर हे गृहराज्यमंत्री असताना मागे घेण्यात आले २३ पैकी २२ गुन्हे त्यांनी मागे घेतले त्याबद्दल सावंत यांनी हे सरकार यांचे आभार मानले.
यावेळी प्रशांत ठाकूर नंदादीप विचारे दिगंबर नाईक मुकेश ठाकूर सुनील सावंत गवस बाळकृष्ण नाईक सतीश सावंत आशिष काष्टे मनोहर येरम अमोल दळवी वैभव जाधव उपस्थित होते.