Hackathon स्पर्धेत केंद्रशाळा कुणकेश्वर नं.१ ची राज्यस्तरावर निवड!

देवगड,दि.३० जानेवारी(दयानंद मांगले)
नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्याने एकविसाव्या शतकातील कौशल्य आत्मसात करावी व त्याचबरोबर मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग,सहकार्य,तार्किक विचार व कोडींगचे ज्ञान अवगत करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात CS hackathon स्पर्धा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या ५० शाळातून ११ शाळांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.त्यांची कोडींग प्रात्यक्षिक स्पर्धा दि.२४ जाने रोजी कुडाळ येथील लेमन ग्रास हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली.या स्पर्धेत जि.प.केंद्रशाळा कुणकेश्वर नं १ ने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून त्यांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय CS hackathon स्पर्धेसाठी झाली आहे.
सदर स्पर्धा Leadership for Equity, Code to enhance Learning, DIET सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (शिक्षण विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
सहभागी विद्यार्थिनी वैदेही हेमंत वातकर,रितू आनंद सावंत,महिका दीपक घाडी यांना scratch या software चा वापर करून कोडींग या विषयाचे मुलभूत मार्गदर्शन प्रशालेच्या शिक्षिका श्रीम.तृप्ती आरोलकर -नारकर यांनी केले.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सुप्रिया सनये व सहशिक्षक श्रीम.पाटील,श्री.लवटे ,श्रीम.धुरी,श्रीम.घाडी या सर्वांचे मार्गदर्शन लाभल्याने या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर निवड झाली आह्रे.तसेच रोख रुपये ५००.मेडल,ZEBRONICS कंपनीचा TV संच शाळेसाठी बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष .रामदास तेली ,कुणकेश्वर गावाचे सरपंच . महेश ताम्हणकर यांनी सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले .राज्यस्तरीय निवडीबद्दल सर्व स्तरातून या विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.