व्यापाऱ्यांनी ही एकजूट कायम ठेवत सिंधुदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर न्यावे-माजी खासदार निलेश राणे

मालवण,दि.३० जानेवारी
आज व्यापाऱ्यांची रॅली पाहून राजकीय पक्षांच्या रॅली फिक्या पडल्या आहेत. सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांनी आपली एकतेचा संदेश देत एकजूट दाखवली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था केवळ शेती मासेमारीवर अवलंबुन न राहता त्यास व्यापार उद्योगाची जोड मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे नेहमीच प्रयत्नशील राहिले. येथील तरुणांना जिल्ह्यातच उद्योग उभारता यावेत, येथेच काम मिळावे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघ कार्यरत आहे. व्यापाऱ्यांनी ही एकजूट कायम ठेवत सिंधुदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर न्यावे असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा मालवण येथील बोर्डिंग मैदानावर २९, ३०, ३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होत असून असून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मालवण व्यापारी संघाच्या आयोजनाखाली हा मेळावा होत आहे.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, प्रमोद ओरोसकर नितीन वाळके, नितीन तायशेटे, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, बाळू अंधारी,
विजय केनवडेकर, अशोक सावंत, अरविंद नेवाळकर, नाना पारकर, यासह व्यापारी युवा व महिला व्यापारी आदी उपस्थित होते