शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी पाचोरा यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड

देवगड,दि.३० जानेवारी(दयानंद मांगले)
पाचोरा येथील रांगोळी कलाकार तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूल चे कलाशिक्षक शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी पाचोरा जिल्हा जळगाव यांना कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड एट्रोन हॉटेल, कोल्हापूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.शैलेश कुलकर्णी हे मागील ५ ते ६ वर्षांपासून रांगोळी कलेमध्ये कार्य करत आहे. त्यांनी आतापर्यंत २००-३०० पोस्टर रांगोळी कलाकृती साकारल्या आहेत.या मधून ते समाजप्रबोधन कार्य देखील करत असतात. अनोमोर्फिक रांगोळी,पोस्टर रांगोळी,३ डी रांगोळी , टू इन वन रांगोळी , परमनंट रांगोळी ई. प्रकार ते रांगोळीतून रेखाटत असतात. या पूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय , राष्ट्रस्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.तसेच त्यांच्या रांगोळी कलेची दखल एशियन बुक ऑफ रेकॉर्ड , इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे. तसेच त्यांनी ४० बाय ६० पासून ते १०० बाय १५० फूट एवढ्या भव्य आकाराच्या रांगोळ्या देखील रेखाटल्या आहेत. ते मुळतः कलशिक्षक असण्याबरोबर च रांगोळी कलाकार व चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे.त्यांनी महाराष्ट्र राज्याबरोबर च गोवा , मध्यप्रदेश , तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये देखील आपल्या रांगोळी कलेचा ठसा उमटवला आहे.तसेच आपल्या कला छंद आर्ट फाउंडेशन मार्फत ते अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. रांगोळी कलेला आपल्या शहरात च नव्हे तर दूरवर पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.