मुणगे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद!

अध्यक्ष गोविंद सावंत यांनी केले उदघाटन

मसुरे,दि.३० जानेवारी(झुंजार पेडणेकर)

मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथप्रदर्शना मध्ये  कथासंग्रह, कादंबरी, नाटक बालवाड:मय आदी वाचनीय साहित्य ठेवण्यात आले होते.
राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे,, केंद्रशासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये महामंडळे सार्वजनिक उपक्रम, सर्वखाजगी, व व्यापारी बँका सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठ/महाविद्यालये इत्यादी संस्थामधून राज्यांची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष महादेव प्रभू ,कार्यकारीनी सदस्य  संतोष लब्दे, सौ उज्ज्वला महाजन,सुनील बोरकर, वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रूपे आदीं उपस्थित होत.या ग्रंथप्रदर्शनामध्ये  सन् २०२३-२४ यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या ग्रंथ ठेवण्यात आले होते. यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, नाटकाची पुस्तके, बालवाड:मय, स्पर्धा परीक्षा पुस्तके, धार्मिक ग्रंथ आदी साहित्याचे प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता.या प्रर्दनाचा लाभ वाचकांनी घेतला.