मुस्लिम समाज अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इब्राहिम शेख यांचा आरोप;मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध
कणकवली दि.३० जानेवारी(भगवान लोके)
उबाठा सेनेचे आमदार राजकारणासाठी मुस्लिम समाज बांधवांना बदनाम करत आहेत. राष्ट्रप्रेमी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांवर चुकीचे आरोप करून देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक यांचा चाललेला आहे. राजकारणासाठी असे बोलणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा मुस्लिम समाज म्हणून आम्ही निषेध असल्याचे प्रसिद्धीपत्रक अल्पसंख्यांक मुस्लिम सेल कणकवली तालुकाध्यक्ष इब्राहिम शेख यांनी काढले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज वैभव नाईक यांच्या अशा वृत्तीला कदापि थारा देणार नाही . भाजपचे आमदार नितेश राणे यांना आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचे आणि त्यासाठी कुरापती काढून मुस्लिम समाजाला टार्गेट करायचे.प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम बांधवांवर गुन्हे दाखल करण्यास पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा. त्या मुस्लिम कार्यकर्त्याची बदनामी करायची, ही पद्धत समाज विरोधी आहे. त्यांना आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुस्लिम समाज आमदार वैभव नाईक यांच्या या वृत्तीची जशास तशी परतफेड करेल आहे. कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षात काम करावे हे ठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.मात्र भारतीय जनता पार्टीत एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती काम करतो म्हणून त्याला टार्गेट करावे,ही पद्धत चुकीची आहे. एखादा कार्यकर्ता उबाठा सेनेत काम करण्यासाठी येत नसेल तर त्याला प्रलोभने द्या आणि ती प्रलोभन तो स्वीकारत नसेल तर त्याची बदनामी करा. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा,अशा पद्धतीची कार्यप्रणाली उबाठा सेनेची आहे.ही पद्धत मोडीत काढले जाईल असा इशारा इब्राहिम शेख यांनी दिला आहे.