नाशिक आरोग्य विद्यापीठात तोंडवलीचा साईराज सातोसे पाचवा

यशाबद्दल साईराज चा सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत यांनी केला सत्कार

कणकवली दि.३० जानेवारी(भगवान लोके)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम‌ परिक्षेत कणकवली तालुक्यातील श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिग,तोंडवलीचा कु. साईराज संजय सातोसे याने उज्वल यश संपादन करत नाशिक आरोग्य विद्यापीठात पाचवा क्रमांक प्राप्त करत विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

त्याचा यशाबद्दल सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत याच्या उपस्थित विद्यापीठ पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी नर्सिंग प्राचार्या डाॅ. शकुंतला नागराज,प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण शिक्षक सागर भोसले,विद्याधर तांबे, जयेश मोचेमोडकर, सुप्रिया मामजी,श्रीमंत खरात,स्वप्नील सुळ, कविता सावंत, प्रिती नाईक, सुधाकर जाधव, सुष्टि कांजी, लखन चव्हाण, रोहिणी सावंत, दिपीका गोसावी, दिपाली बेले, धनश्री हरकुळकर, मिताली पराडकर आदी उपस्थित होते.

कु. साईराज हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ निरूखे येथील असून श्री सरस्वती नर्सिंग कॉलेज तोंडवली येथे शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, परिक्षा नियंत्रक डाॅ.अरूण कडू यानी विशेष पत्र व प्रमाणपत्र पाठवित अभिनंदन केले.