मुंबई गोवा महामार्गावर नडगिवे घाटात कंटेनर पलटी

कणकवली दि.३० जानेवारी(भगवान लोके)
नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी होवून अपघात झाला.गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चा 11:30 च्या सुमारास नडगिवे घाटात अपघात झाला.या अपघातात कंटेनर चे नुकसान झाले आहे.अपघातात वाहन चालक जखमी झाला ,त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दुरक्षेत्र चे पोलीस कॉन्स्टेबल श्री.मोहिते यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली.