उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतले रिक्षा संघटना श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन!

देवगड,दि.३० जानेवारी
रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहर यांच्यावतीने मंगळवार दि. जानेवारी २०२४ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा देवगड जामसंडे नगरपंचायत बालोद्यान एसटी स्टँड समोर या ठिकाणी आयोजन केले आहे . यानिमित्त देवगडचे दानशूर उद्योजक नंदकुमार घाटे यांनी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांचे संघटना पदाधिकारी यांनी स्वागत केले. आकर्षक श्री नागराज श्री सत्यनारायण महापूजा साकारण्यात आली असून भाविकांचे आकर्षण ठरले आहे.दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजलेपासून सुश्राव्य भजने संपन्न होणार आहेत.