कारिवडे गावात आयोजित मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद

सावंतवाडी,दि.३० जानेवारी

येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारिवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधेही देण्यात आली.
कारिवडे प्राथमिक शाळा नं १ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच लक्ष्मण सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितीन गावडे, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत, डॉ चेतन परब, डॉ अंकिता मसुरकर, डॉ स्नेहल परब, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख मयुरेश रेडकर, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, पोलीस पाटील प्रदीप केळुस्कर, ग्रामसेवक भरत बुंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश गावकर, बाळकृष्ण कवठणकर, साक्षी परब, सेजल कारीवडेकर, तन्वी साईल, अरुणा सावंत,
सौ भाग्यश्री भारमल, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर, आनंद तळवणेकर, शंकर मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश गावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता पास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ चेतन परब, डॉ अंकिता मसुरकर, डॉ स्नेहल परब यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच आरती माळकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर उपसरपंच नितीन गावडे यांनी कारीवडे गावात आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे आभार मानले.
या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रसाद सापळे, अँड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे कर्मचारी तेजस पडते तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी केले.