सावंतवाडी शहराला चिंदी चोर विकास नको असून शाश्वत विकासाची गरज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी,दि.३० जानेवारी
शहराच्या आवश्यक बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असेल आणि शाश्वत विकासाला खो घालण्याचे काम केलं जात आहे शहर विकासात गोल गोल भूमिका शहर विकासाला मारकच आहे शहरात भुयारी गटार योजना आवश्यक आहे पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे,असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता आहे सद्यस्थितीमध्ये भुयारी गटार योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करा नवीन मुख्याधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे.. शहरांमध्ये मोठमोठे टॉवर उभे राहत असताना भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे झाले आहे . स्वतःच्या हट्टा पायी प्रत्येक सोसायटीला एसटीपी प्लांट बसविले जात आहेत परंतु सोसायटी नाही प्लांट परवडणारे नसतात सोसायटी पुढे हे प्लांट चालवत नाही कारण याचे वीज बिल एवढे भरमसाठ येते ते भरणं सोसायटीला शक्य नसतं परिणामी दुर्गंध युक्त पाणी गटारातून वाहताना दिसतं हे सावंतवाडी शहराला भूषण नाही असे साळगावकर यांनी म्हटले आहे.

स्वतःचा हट्ट बाजूला ठेवून भुयारी गटार योजना सावंतवाडीच्या हितासाठी तात्काळ राबवावी सावंतवाडीच्या प्रत्येक नागरिकांनी भुयारी गटार योजनेसाठी आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे
[ सावंतवाडी शहरातील मोती तलावाला शहराचं ह्दय म्हटलं जातं याच मोती तलावाची दुर्दशा आज बघवत नाही अशी झाली आहे एके बाजूने दुर्गंधी पसरली आहे मासे मरत आहेत सीओडीबीओडीस तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे वरच्या बाजूने ड्रेनेज मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे रॅम साठी आणलेल्या मातीतून आलेली वनस्पती संपूर्ण तलावात पसरलेली आहे मोती तलाव वाचवणे आवश्यक आहे यासाठी मोती तलाव बचाव समिती स्थापन लवकरच करत असून मोती तलाव बचाव समितीच्या लवकरच करत आहोत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.
मोती तलावाच्या पाण्यात ऑक्सिजन मिळत नाही व पाण्यावर तवंग आल्याने पाण्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी जलदगतीने पाऊले उचलली पाहिजेत असे बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.